सातारा पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करून नागरिकांना केले परत…
साताराः मल्हारपेठ पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचे गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच माहीत असतात. असे रू. ३,७३,०००/- किमतीचे मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी अथक प्रयत्न करून चोरट्यांकडून मिळवले आणि ते मोबाईल चोरीला गेलेल्या व गहाळ झालेला नागरिकांना ते परत केले. लाख मोलाचे मोबाईल नागरिकांना जेव्हा मल्हारपेठ पोलिसांनी स्फूर्ती केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मल्हारपेठ पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी नागरीकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी मल्हारपेठ पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या.
त्या अनुशंगाने पथकातील पोलिस स्टाफ ने सी.ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहीती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परीश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलिस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. दिनांक 1 ऑगस्ट रोजी चेतन मछले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारपेठ पोलिस ठाणे याचे हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहीम समीर शेख पोलिस अधिक्षक सो सातारा, आँचल दलाल अप्पर पोलिस अधिक्षक साो सातारा, सविता गर्जे, पोलिस उपअधिक्षक, पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलिस ठाणेचे सहा. पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई समीर शेख पोलिस अधिक्षक सातारा, आँचल दलाल अप्पर पोलिस अधिक्षक सातारा, सविता गर्जे, पोलिस उपअधिक्षक पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उपनिरीक्षक नितेश पोटे, पोलिस उपनिरीक्षक रामराव वेताळ, पोलिस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे, सायबर पोलिस ठाणेचे पोलिस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केलेली आहे.
Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…
पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…
सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…