एका बायकोसाठी दोन नवरे भांडत पोहचले पोलिसस्टेशनमध्ये; अखेर…
पाटणा (बिहार): एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते. हा गोंधळ बराच वेळ सुरू राहिला. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. पोलिस स्टेशनमध्ये दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला. अखेर, महिलेने दोन पतींपैकी एकाची निवड केली. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
संबंधित महिला तीन मुलांची आई आहे. तिला 18 आणि 20 वर्षांची दोन मुलं आणि 13 वर्षांची एक मुलगी आहे. दोन्ही व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली.
मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या सकरा पोलिस स्टेशन हद्दीतल्या बखरी गावातला रहिवासी राम प्रसाद महतो यांचे साक्रा पोलिस स्टेशन हद्दीतल्या मझौली गावातल्या मुलीशी 22 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली. दरम्यान, 2018 मध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह घर सोडून हाजीपूरला गेली. तिथे ती एका कंपनीत काम करू लागली. दरम्यान, ही महिला कुढणी पोलिस स्टेशन हद्दीतल्या ढोडी गावात राहणाऱ्या बथू राय यांच्या पत्नीला भेटली आणि तिच्यासोबत ढोडी येथे आली. काही दिवसांनी ती ढोडीजवळ असलेल्या चैनपूर भटौलिया गावातले रहिवासी हरेंद्र राय यांच्यासोबत राहू लागली.
महिलेचा पहिला पती राम प्रसाद याने पोलिसांना सांगितले, ‘पत्नीचा सात वर्षांपासून शोध घेत होतो. गेल्या मंगळवारी आपली पत्नी भटौलिया गावात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नीला भेटायला आलो. पण, दुसरा व्यक्ती ही आपली पत्नी असल्याचे सांगत होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहचले.’ दरम्यान, महिलेला आपल्यासोबत घेऊन जाण्यास दोन्ही व्यक्ती तयार होते. पण, महिलेने पुन्हा आपल्या पहिल्या पतीसोबत जाणार असल्याचे सांगितल्यानंतर भांडण संपले. यानंतर तिला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठवण्यात आले. भारतामध्ये पहिला पती किंवा पत्नी जिवंत असताना घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबतची माहिती दुसऱ्या व्यक्तीला दिल्यानंतर तो सुद्धा शांत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…
प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…
धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…
नवरा तिसरं लग्न करत असतानाच दोघी मंडपात पोहोचल्या अन्…
16 नातवंडे असणाऱ्या 70 वर्षीय आजोबांनी केले दुसरे लग्न अन्…
जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…