सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे.

संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर कृष्णा नदीपात्रात शोध मोहिम राबवण्यात आली, त्यावेळी मुलीचा मृतदेह सापडला होता. आता, 7 दिवसांनंतर आईचाही मृतदेह सापडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता साळुंखे (वय 22) महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. कौटुंबिक कारणास्तव या महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 27 जुलै रोजी झालेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना घटनास्थळापासून आठ किलो मिटरवरील गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला.

दरम्यान, कृष्णा नदीच्या पात्रता उडी घेतलेली ही महिला काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मात्र, आता या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह नदीत उडी घेतली. या घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही.

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!