पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलियासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी येथील प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंट गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढोकलियासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईटस, बिबवेवाडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकड यांचा व्यवस्थापक तसेच अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये गुरुवारी (ता. ७) सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अमित लुंकड यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. शिवाय, अनेक तक्रारींचे निवारण अद्याप झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. वडगाव शेरी सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांच्याकडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा ही लुंकड यांनी खरेदी केली होती. २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडून ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे व ३.५ गुंठे तेजस प्रविण दुगड यांच्या नावाने खरेदी खताने खरेदी केली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ वर त्यांचे नाव आहे. तसेच जागा खरेदी करताना या जागेवर सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटला सात प्रॉपर्टी टॅक्स होते. ते सुद्धा दुगड यांच्या नावावर केलेले आहे. सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होते. ते फिर्यादी यांच्या नावावर करुन घेतले होते. या जागेवर बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडे एमओडीची एनओसी घेतली. फायरची प्रोव्हिजनल एनओसी घेतली. पुणे महानगरपोलिककडे जवळपास ५ कोटी रुपये चलन भरलेले आहे. गौण खनिजची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसे भरल्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लास्टिंगची परवानगी घेतली आहे. जागेवर बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम चालू केले आहे. त्या ठिकाणी सध्या काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता दोन सुपरवायझर, दोन वॉचमन, सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती केलेली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांचा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता फोन आला. आपला सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळविले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा व्यवस्थापक व इतर ३० ते ४० जण आठ दहा ट्रॅक्टर, दोन तीन डंपर, वॉटर टॅकर घेऊन आले असून त्यांनी साईटचे समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने आपल्या प्लॉटमध्ये घुसवली आहेत. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले. दरम्यान, पोलिसही तेथे आले. तेव्हा तेथे अमित लुंकड याने सोबतच्या व्यक्तींना फिर्यादी ला मारण्याच्या धमक्या देऊन इथून तुम्ही निघुन जावा, हा आमचा प्लॉट असल्याचे सांगत होता.

विमाननगरचे पोलिस निरीक्षक गोविंद जाधव घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिसांसमोर फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीमध्ये हत्यारे आहेत, असे म्हटले असता तो गाडीमध्ये बसुन पळून गेला. प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, अमित लुंकड हा सतत म्हणत होता की कमिशनर ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार करेल आणि फोन सुद्धा करत होता. अमित लुंकड हा पोलिस आयुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून दडपण आणण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती फिर्यादी यांनी दिली.

पुणे! देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…

पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

पुणे! बाणेर पोलिसांनी ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासत चार आरोपींना केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!