UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

अकोला : अकोला येथील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक बांबीवर तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

अंजली अनिल गोपनारायण हिने काही दिवसांपूर्वी बनवलेली ही रील दिवा असलेली अधिकाऱ्याची गाडी हे तिचं स्वप्न होते. अंजली ही अकोल्यातील गंगानगर भागात राहात होती. तिचे वडिल पोलीस शिपाई आहेत. अंजलीला सनदी अधिकारी व्हायचे होते. यासाठी तिने दोन वर्षांपूर्वी दिल्ली गाठली होती. पण, 23 जुलै रोजी जगाचा निरोप घेतला.

policekaka-special-offer

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

अंजलीने दिल्लीतील राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत 21 जुलै फाशी घेऊन आत्महत्या केली. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव, सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून जीवन संपवले. सुसाइड नोटमधून स्पष्ट होते की, त्या विद्यार्थिनीला किती मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत होता. तिने आपल्या नोटमध्ये लिहिले की पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की तिने खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचे एकच स्वप्न होते की, ती पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे, ज्यांनी तिला समर्थन दिले, पण तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे. सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही. तिने असेही लिहिले आहे की पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणे आवश्यक आहे.

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…

धक्कादायक! MBBS युवतीची नदीत उडी घेऊन आत्महत्या…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!