प्रेमीयुगलच्या खोलीत मॅनेजरने खिडकीतून डोकावले अन् बसला धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश): संभल जिल्ह्यात एका प्रेमीयुगलाने ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. दुसऱ्या दिवशी दोघे बाहेर न आल्यामुळे व्यवस्थापकाने खिडकीमधून आत डोकावल्यानंतर आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

संभलची युवती (वय 23) आणि दिल्लीतील युवक (वय 20) या दोघांनी फतेहुल्ला सराय मोहल्ला येथील ओयो हॉटेलमध्ये एक रूम घेतली. दोघांचे आयडी पाहून हॉटेल मॅनेजरने त्यांना खोली दिली होती. दोघं खोलीत गेले. पण त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीतून कोणताही आवाज आला नाही. रात्री 11 वाजता त्यांच्या चेकआऊटची वेळ झाली होती. याची माहिती देण्यासाठी म्हणून हॉटेलचा मॅनेजर त्यांच्या रूममवर गेला, तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने डोअरबेल वाजवली पण आतून कुणाचाच आवाज आला नाही. त्यानंतर त्याने रूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले आणि धक्काच बसला.

युवक फासाला लटकलेला होता, तर युवती बेडवर होती. हे दृश्य पाहून मॅनेजर हादरला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेतफॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी कसून तपास करून पुरावे गोळा केले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच हे संपूर्ण प्रकरण उघड होईल.

ओळखपत्राच्या आधारे युवक-युवतीच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसते. मुलीच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे काही विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय आहे. पोलिसांनी हॉटेलही सील केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!