नालासोपाऱ्यात तस्करीची पाळेमुळे उत्तर प्रदेशात; ड्रग ‘फॅक्टरी’ प्रयागराजमध्ये उद्ध्वस्त; ७० किलो ‘एमडी’ जप्त…
भाईंदर: मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील नालासोपारा येथून सुरू झालेल्या एमडी (मेफेड्रॉन) तस्करीच्या तपासाची पाळेमुळे, थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत पोचली आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ च्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने प्रयागराजमधील ‘एमडी’ ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ५२ किलो ९३२ ग्रॅम ‘एमडी’, मोठ्या प्रमाणात रसायने आणि ड्रग निर्मितीसाठी […]
अधिक वाचा...स्वस्त घर आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार
ठाणे: स्वस्त दरात घर देण्याचे आमिष आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तब्बल १२ टक्के मासिक व्याज मिळवून देण्याचे आश्वासन देत, एका ६४ वर्षीय निवृत्त व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अविनाश दगडू गायकवाड, कविता अविनाश गायकवाड आणि स्वराज छिंदलाल मलिक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलशेत येथे […]
अधिक वाचा...संतापजनक! शाळेच्या स्कुल बसमध्ये चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य…
पनवेल : एका शाळेच्या स्कुल बसमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लिल कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे पनवेल शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकाला (वय ३०) अटक केली असून, पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी बसचा चालक होता. बुधवारी […]
अधिक वाचा...कोल्हापूर! वहिनी घरात एकटीच असताना दीर आला अन्…
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे चुलत दिराने वहिनीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणात मृत पूजा दाभाडे हिचे पती अविनाश यांनी कोडोली पोलिसांत एकतर्फी प्रेमातून खून झाल्याची फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सुरेश दाभाडे (वय 38) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काखेपैकी शाहूनगर वसाहत येथील आरोपी सुरेश […]
अधिक वाचा...३८ आठवड्यांची गरोदर; ऑपरेशनच्या वेळी मात्र पोटातले बाळ गायब? मग बाळ गेले तरी कुठे…
कराचीः एका ३८ आठवड्यांच्या गर्भवती महिलेला रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डिलिव्हरीची तयारी सुरू केली, परंतु डिलिव्हरी करताना डॉक्टरांना समजले, की पोटात बाळच नाही! ही, महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती, असा दावा तिच्या कुटुंबीयांनीही केला. पुराव्यादाखल त्यांनी वेळोवेळी रुग्णालयातून मिळालेले रिपोर्टही दाखवले. मग बाळ नेमके गेले कुठे? ही महिला खरेच गर्भवती होती का? जर […]
अधिक वाचा...तीन मुलांसह मातेची नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन मुलींची प्रकृती गंभीर…
धाराशिवः धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका मातेने आपल्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलांसह थेट खाली उडी मारली. या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग […]
अधिक वाचा...भरधाव थार चालकाने दिलेल्या धडकेत दिल्लीत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू…
नवी दिल्लीः दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने, मोटारसायकलस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज येथे दिली. मृतांची ओळख अंजू (वय अंदाजे ५०) आणि सुखबीर (वय अंदाजे ४५) अशी पटली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना […]
अधिक वाचा...गृहनिर्माण संस्थेच्या जिन्यात सायकल पार्क केल्याबद्दलचा १५.४५ लाख रुपयांचा दंड उच्च न्यायालयाकडून रद्द…
मुंबईः मुंबईतील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जिन्यात ११,००० रुपये किमतीची सायकल ठेवल्याच्या घटनेमुळे, सामायिक जागेवरील कथित अतिक्रमणाबद्दल सदस्यांना दंड आकारण्याच्या संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना, ही कारवाई मनमानी असून गृहनिर्माण संस्थांनी अवाजवी वापर करू नये, असे म्हटले आहे. संस्थेने सुमारे ११ वर्षांच्या अतिक्रमणापोटी १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांची मागणी […]
अधिक वाचा...मोटर अपघात दावा न्यायाधिकरण सदस्यास जिवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई: मोटर अपघात दावा न्यायाधिकरण (एमएसीटी) सदस्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, मुंबईत माटुंगा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार शशिकांत एकनाथराव बांगर (वय ५४) यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दादरमध्ये इराणी मॅन्शनजवळ त्यांची गाडी थांबवली आणि चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले, की अज्ञात आरोपींनी दादरमध्ये एका अधिकाऱ्याची एसयूव्ही गाडी थांबवली आणि गाडीचे […]
अधिक वाचा...पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…
पुणे: पुणे शहरात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज (गुरूवार) टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीची प्राथमिक माहिती समोर आली असून, संतोष चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपीबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट (वय ३७) हे […]
अधिक वाचा...
