आळंदी परिसरात छापा टाकून ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त…
पुणे (सुनिल सांबारे): खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात छापा टाकून ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. एकास अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हद्दीमधील अवैध धंद्यांची माहिती काढून, कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे अवैध धंद्यांची माहिती काढत होते. पोलिस हवालदार प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, ‘आळंदी, मरकळ रोड, धानोरेफाटा येथील पत्र्याचे खोलीत एक व्यक्ती घरगुती भरलेल्या सिलबंद गॅस सिलेंडर मधुन छोट्या रिकाम्या ४ किलो च्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस अवैधरित्या रिफील करुन त्या विक्री करत आहे.”
पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी सहा पोलिस निरीक्षक उद्धव खाडे यांना स्टाफसह रवाना केले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी ०२ तास सर्च ऑपरेशन करुन, एका पत्र्याचे खोलीत सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफीलींग करीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. छाप्यामध्ये संदीप नरसिंग लांडगे (वय २४, रा. देवनिवास बिल्डिंग, रुम नं. १, ठाकूरवस्ती, मरकळ रोड, आळंदी पुणे) हा मिळून आला. सदर ठिकाणी ६२,८००/-रुकिंचा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ०८ घरगुती वापराचे सिलेंडर, ०१ व्यवसायिक सिलेंडर, १३ लहान गॅस भरलेले सिलेंडर, ३७ रिकामे लहान सिलेंडर, ०५ पितळी रीफीलर नोजल, ०२ गॅस रिफिलिंग सर्किट असे साहित्य मिळून आल्याने ते जप्त केले. संदीप नरसिंग लांडगे याच्या विरुध्द आळंदी पोलिस ठाणे गुन्हा दाखल करुन, आरोपीस पुढील कार्यवाहीकामी आळंदी पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे पोलिस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, किरण काटकर यांचे पथकाने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…
पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्टल जप्त…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…
पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!