कोपरगाव हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून…

अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारून पटेल (वय २८) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी (ता. २१) रात्रीच्या […]

अधिक वाचा...

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

अहमदाबाद (गुजरात) : एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराच्या दारातच विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे एका गुंडासोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती. एका मुलाच्या अपहरण प्रकरणातही ती सहभागी होती. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात रात्र गस्त पथकातील पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वसरंक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने एक राउंड फायर केला. कात्रजच्या वंडरसिटी परिसरात शनिवारी (दि.२१) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०, रा. […]

अधिक वाचा...

Hit and Run! पिंपरी-चिंचवडमध्ये कारने पादचारी महिलेला उडवलं…

पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात हिट अँड रनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलेच्या अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने यात महिला थोडक्यात बचावली आहे, मात्र त्या जखमी झाल्या आहे. पिंपरी गावात रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…

पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर […]

अधिक वाचा...

पोलिसकाका Video News: २२ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना वाढदिवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! पुणेः लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना वाढदिवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले सत्यसाई कार्तिक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे‌. पुण्यात पोलिसाकडून पीएमटी चालकाला […]

अधिक वाचा...

Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!

(उदय आठल्ये) पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई मधीरा कार्तिक यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. यानिमित्ताने पोलिस लेखक ‘उदय आठल्ये’ यांनी घेतलेला आढावा… राज्यातील एक आगळे वेगळे अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक हे ओळखले जातात. तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज. आजकालच्या तरुणांना भविष्याची काही फिकीरच उरलेली नाही. त्यांच्या वर्तनातूनच असे जाणवते. आपली मुले […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलाच्या पँटमध्ये शिरला कोब्रा अन् नको तिथे केला दंश…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका मुलगा घरात पलंगावर झोपलेला असताना कोब्रा त्याच्या पँटमध्ये शिरला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दंश केला. मुलाला साप चावल्याचे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी त्यालाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा मृत्यू झाला. कणकुंड खाटांबा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. चंदन मालवीय (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…

पुणे (संदिप कद्रे): खडक पोलिस स्टेशन कडून नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले ४,००००० रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ- ०१ मधिल नागरिकांचे सन २०२३ ते २०२४ मध्ये चोरीस गेलेले / गहाळ झालेले मोबाईल संदर्भात खडक पोलिस स्टेशन येथे तक्रारी प्राप्त झालेल्या […]

अधिक वाचा...

UPSC अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; मोठा निर्णय…

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याला अजून पाच वर्षे शिल्लक असताना दिलेल्या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. डॉक्टर मनोज सोनी हे 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले. तर, 2023 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मनोज […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!