पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिक अल्पवयीन पुत्राने भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर आणि आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. पुढे, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत.

या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोर्शे कार चालवायला दिल्याने पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलाला दारू दिल्याने पबमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून विशाल अगरवाल सह त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

विशाल अग्रवालच्या अडचणी आणखी वाढणार असून, येरवडा पोलिसांनी मूळ अपघाताच्या गुन्ह्यांत पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ वाढवले आहे. तसेच गुन्हे शाखेकडून विशाल अगरवालवर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी ४२० चा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून आलेल्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या अपघात प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठा दावा केला आहे. ‘गुन्हा दाखल करताना चालक गाडी चालवत होता असे भासवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे चालकावर कोणाचा दबाब होता का हे आता तपासलं जाणार आहे. ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला होता, हे खरं आहे म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आले आहे. गाडीत त्यावेळी असलेल्या इतर तीन मुलांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे,’ असे अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणातील सर्व आरोपींची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!