महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

बंगळुरु: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने घर सोडले होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास के आर मार्केटमधील गोडाऊन स्ट्रीटजवळ महिला बसची वाट बघत उभी होती. यावेळी तिने बाजूला उभ्या असणाऱ्या काही व्यक्तींना येलहांकाला जाणारी बस कधी येणार, असे विचारले. तेव्हा तेथील लोकांनी तिला बसस्टॉप दुसऱ्या जागी असल्याचे सांगितले. या लोकांनी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने गोडाऊन स्ट्रीट परिसरात नेले. यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेकडील मोबाईल, दागिने आणि पैसे चोरले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले आहे.

बंगळुरुचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी संबंधित महिलेला निवारा गृहात पाठवण्यात आले असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले. पोलिसांनी अद्याप याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र, हे सर्वजण के आर मार्केटमध्ये मजूरी करत होते, अशी माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!