लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…

लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. 30/07/2023 पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने सराफांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 आरोपींना जुने रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, वय 19 वर्ष, राहणार अंजनसोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर.
2) अभंग काशिनाथ घोलपे, वय 29 वर्ष राहणार काळेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ ,जिल्हा लातूर.
असे असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकल वरून येऊन हिसका मारून जबरीने चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलिस ठाणे एमआयडीसी येथील चैन स्नॅचिंग चे 2 गुन्हे, पोलिस ठाणे गांधीचौक येथील 1 गुन्हा, पोलिस ठाणे लातूर ग्रामीण येथील 1 गुन्हा, पोलिस ठाणे उदगीर शहर येथे दाखल असलेला 1 गुन्हा तसेच पोलिस ठाणे एमआयडीसी येथील मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा असे दाखल असल्याचे दिसून आले आणि ते सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 74.3 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्रे तसेच एक पोलिस ठाणे चोरीची मोटारसायकल व असा एकूण 3,15,300/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलिस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नाना भोंग, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख,नकुल पाटील यांनी केली आहे.

लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!