यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मुंबई : नवी मुंबई भागातील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने यशश्री हिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. दाऊद शेख याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

यशश्री शिंदे ही गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला होता. यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशश्रीची हत्या केल्याचा आरोप आहे. दाऊद शेख याला कर्नाटकच्या शाहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचे काम करत होता. त्याची मृत यशश्रीशी भेट झाली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन हत्येची घटना घडली आहे. पोलिसांनी यापूर्वीच आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले होते. आता आरोपीला देखील पकडण्यात आले आहे.

पोलिसकाका Video News: ३० जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!