नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश): बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमधल्या सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका बापाने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर आई रुग्णालयात घेऊन गेली होती. यावेळी डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे समजातच आईला धक्का बसला. आईने तत्काळ पोलिस स्टेशनकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 14 वर्षांच्या मुलीने तिच्या आईकडे पोटदुखीची तक्रार केली होती. आईने मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीने सुरवातीला पोलिसांना खोटी माहिती दिली. पार्कमध्ये गोलू नावाच्या युवकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र ती पोलिसांना घटनास्थळाबाबत जास्त काही सांगू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलीचे समुपदेशन केले असता तिने धक्कादायक खुलासा केला. वडील गेल्या एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार करत आहेत. वडिलांच्या भीतीमुळे आणि बदनामीच्या भीतीने तिने याबाबत वाच्यता केली नव्हती. पीडित मुलीने खुलासा केल्यानंतर तिच्या पित्याला अटक केली आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिकत असून, आरोपी रिक्षाचालक आहे.

दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!