
अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…
नागपूर: एका शिक्षकाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह स्वतःच्या घरातील खोलीत खड्डा करून पुरल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरात ही हत्या करण्यात आली असून, आरोपीने मृतदेह नागपूरमधील हिंगणा परिसरात आणून लपवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने छडा लावत आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वैशाली विलास टिपले आणि आरोपी शिक्षक संतोष भगवान साखरकर हे दोघेही चंद्रपूर शहरात राहत होते. त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या संतोषने वैशालीच्या छातीवर एका जड वस्तूने जोरात वार केला. या प्राणघातक हल्ल्यात वैशालीचा जागीच मृत्यू झाला.
View this post on Instagram
वैशाली हिची हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी संतोषने मृतदेह चंद्रपूरहून नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होली परिसरातील आपल्या घरी आणला. स्वतःच्या घराच्या खोलीतच खड्डा खणून त्याने तो मृतदेह तिथे पुरला. मात्र, वैशाली मृत्यूपूर्वीपासून बेपत्ता असल्याने पोलिसांनी तिच्या मोबाईलच्या सीडीआर काढत तांत्रिक तपासाला सुरुवात केली. तिच्या मोबाईलच्या सीडीआरवरून पोलिसांना आरोपी संतोषवर संशय बळावला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच संतोष याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीनं कबुली दिल्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी नागपूरच्या हिंगणा पोलिसांच्या मदतीने रविवारी आरोपीच्या घराची झडती घेतली आणि खोलीतील खड्ड्यातून वैशालीचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी आरोपी संतोष साखरकर याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे…
प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…
शिक्षक दांपत्याचा अभियंता मुलगा अन् चोरायचा महिलांची अंतवस्त्रे…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
प्रियकराच्या घरी गेलल्या बायकोचे संतापलेल्या नवऱ्याने चावले नाक…

