सिनेस्टाईल थरार! पोलिसावरील हल्ल्यानंतर आरोपीच्या पायात झाडली गोळी अन्…

नांदेड : विविध गंभीर गुन्ह्यात फरार असेलल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने खंजरने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जायबंदी अटक केली आहे. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात हा सिनेस्टाईल थरार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आवेझ उर्फ अबू शूटर आणि दिपक बोकरे हे दोघे अनेक गंभीर गुन्हात फरार आरोपी आहेत. हे दोघेही तरोडा नाका भागात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांतर्फे पोलिसाना मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांना पाहून दोन्ही आरोपी पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. एका शाळेजवळ अबु शूटर याने विद्यार्थ्याची स्कूटी हिसकवण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याला पोलिसांनी गाठले. तेव्हा अबू शूटर याने खंजरने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलिसांना दुखापत झाली. प्रतिउत्तरात पोलिसांनी अबू शूटरच्या पायावर गोळी झाडून त्याला अटक केली. दरम्यान, यावेळी दिपक बोकरे पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान, पोलिसांनी अबू शूटर याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा…

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!