
Video : गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला? धक्कादायक माहिती आली समोर…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी (ता. १८) झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफसह कार चालक आणि आणखी एक जण जखमी झाला असला, तरी सुदैवाने टायगर सुखरूप असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
जुहू येथील एका टर्फवर फुटबॉल खेळून टायगर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी निघाला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी तो चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत होता. तो गाडीत बसताच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस आणि गुन्हे शाखेची फॉरेन्सिक पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी संपूर्ण परिसर सील करून रस्त्यावरील वाहनांची कसून तपासणी सुरू केली. रात्रीच्या सुमारास सांताक्रूझ येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
View this post on Instagram
फुटबॉल ग्राउंडजवळ उभ्या असलेल्या एका चाहत्याच्या मोबाइलमध्ये हा संपूर्ण गोळीबार कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक हल्लेखोर टायगरच्या कारपासून अगदी एक-दोन फुटांच्या अंतरावर असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्याच क्षणी त्या हल्लेखोरावरचे पिस्तूल जाम झाले आणि गोळी अडकल्याने ती झाडलीच गेली नाही. तितक्यात कार पुढे सरकल्याने टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला.
व्हिडिओ फुटेजवरून तिन्ही हल्लेखोर तरुण असल्याचे स्पष्ट होते. हल्ल्यानंतर आरोपी काही सेकंदांतच घटनास्थळावरून पसार झाले. विशेष म्हणजे, टायगरची कार बुलेटप्रूफ नव्हती आणि ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला, तिथून जुहू पोलीस ठाणे केवळ ३५० मीटर अंतरावर आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, या हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी असलेल्या सलमा या महिलेने तिच्या भेटीचा आणि घटनेचा थरारक अनुभव सांगितला. महिलेने सांगितले की, नेहमीप्रमाणे रविवारी ती टाइगर श्रॉफ आणि अभिषेक यांच्या ब्लॉगचे शूटिंग करण्यासाठी पोहोचली होती. मात्र, शूटिंगचे ठिकाण बदलल्यामुळे ती दोघांना रेकॉर्ड करू शकली नाही. याच दरम्यान अचानक तिला ४ ते ५ गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला तिला वाटले की दिवाळीमुळे फटाके फुटत आहेत किंवा आनंदात हवेत गोळीबार सुरू आहे. परंतु, काही वेळानंतर जेव्हा कार थांबली आणि तिचा ड्रायव्हर जखमी अवस्थेत बाहेर आला.
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
अभिनेता सलमान खान याच्या घरात मध्यरात्री युवतीने केला घुसण्याचा प्रयत्न; युवती कोण पाहा…
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोल याला NIAने घेतले ताब्यात…

