
नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…
नाशिक : एका भोंदूने आजाराने त्रस्त झालेल्या महिलेचा पूजाविधीने आजार बरा करणे आणि दैवी व अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या भोंदूबाबा विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल येथील अस्थमा झालेल्या महिलेला नाशिकच्या गंगापूर शिवारातील अरुण धोंडू पाटील या भोंदूबाबाच्या दैवी शक्तीबद्दल माहिती मिळाली. त्याने पीडितेला नाशिकला येण्यासाठी पनवेलला गाडी पाठवली. तिला व तिच्या पतीला पनवेलवरून डोळ्यावर काळी पट्टी बांधून नाशिकला आणले. यावेळी अघोरी पूजा झाल्यावर पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून पनवेलला सोडले. पुन्हा दुसऱ्या वेळेही असेच करत त्यांना आजारपणाचा गुण आल्याचा भास झाल्याने त्यांचा भोंदूवर विश्वास बसला. नंतर भोंदूने पैशाचा पाऊस पाडून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी पीडितेच्या मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणायला सांगितले. यावेळी पनवेलवरून त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून नाशिक येथे बालाजी मंदिराजवळ, गंगापूर रोड येथे आणले. तिथे तिची अघोरी पूजा करण्यात आली. तिच्या अंगावरचे कपडे काढून सफेद पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले. त्यावर पाणी टाकण्यात आले. मासिक पाळीचे रक्ताने माखलेले कपड्याची पूजा केली. यावेळी मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी, बुक्का आदी वापरून अघोरी पूजा करण्यात आली.
View this post on Instagram
दरम्यान, पीडितेने दिलेल्या पाच लाख रुपयांची पूजा केली. भोंदूने मंत्रोच्चार करत साधारण दोन तास ही अघोरी पूजा केली. त्यासाठी बोकडाचा बळी देण्यात आला. घरी गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल असे सांगितले आणि पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला पोहचते केले. या सर्व तिन्ही पूजाविधीचे भोंदूने त्यांच्या कडून एकूण साडेसात लाख रुपये उकळले. मात्र त्यानंतर पैशांचा पाऊस पडलाच नाही व महिलेचे आजारपणही दूर झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैसे परत मागण्यासाठी या महिलेने भोंदू बाबाकडे तगादा लावला. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सदर भोंदू अरुण धोंडू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या भोंदूने ज्या लोकांना दैवी व अघोरी शक्ती, मंत्र तंत्र, पूजा विधी करून पैशाचा पाऊस पाडण्याचा बहाणा करून, फसवले असेल त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी व महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
भोंदूबाबा म्हणाला; अंगात शिरले भूत अन् केला लैंगिक अत्याचार…
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
भोंदूबाबाने पतीला बाहेर पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं…
पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

