लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : लाचेची मागणी केल्या प्रकरणी आर्णी पंचायत समितीचे ग्रामसेवक महेश मंचलवार (48 वारको सिटी यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेचे पंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी रामदास चंदनकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी ॲड. एन. एच. पाटील मार्फत जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लउळकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तथापि, त्यांना 20 मे रोजी काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे यांचे तर्फे ॲड. एन. एच. पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सदर प्रकरणातील तक्रारदार महेश मंचलवार हे ग्रामसेवक असून निलंबित झालेल्या निलंबनाचा आदेश रद्दबाह्य करणेबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे यांना विनंती अर्ज दिला असता, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना फेर तपासणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. सदर प्रकरणाची फाईल तयार करणारे आलोसे रामदास चंदनकर (प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी जि. प. यवतमाळ) यांनी चौकशी अंति निलंबन रद्द आदेश करून पुर्न:स्थापित करण्याकरिता तक्रारदार महेश मंचलवार यांना आलोसे रामदास चंदनकर (प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी, जि. प., यवतमाळ) यांनी 50,000/-रुपयाची मागणी केली. परंतु आलोसे रामदास चंदनकर यांना संशय आल्याने त्यांनी सापळा कार्यवाही दरम्यान लाच रक्कम स्वीकारली नाही. आलोसे रामदास चंदनकर यांना ताब्यात घेतले असून त्यांचा जामीन या पुर्वी मंजूर करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अनील पवार (अमरावती), पोलिस उप अधीक्षक उत्तम नामवाडे, यवतमाळ घटक, (यवतमाळ) पोलिस निरीक्षक विनायक कारेगांवकर , पोलिस निरीक्षक अमित वानखडे, वाहन चालक पोलिस उप निरीक्षक संजय कांबळे, पोलिस अंमलदार जयंत ब्राह्मणकर, अब्दुल वसीम, सचिन भोयर, सुधीर कांबळे, भागवत पाटील, ईफ्राज काजी, सुरज मेश्राम, सतीश सोनोने आदींनी सापळा कारवाई केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग…
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाच लुचपत प्रतिबंधक, यवतमाळ, जि. यवतमाळ पोलिस उप अधीक्षक @दुरध्वनी क्रं – 07232- 244002
मो.7722002555
@टोल फ्रि क्रं 1064

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!