
…तर पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणार: गृहमंत्री
नागपूरः अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढत असून ड्रग्जमाफियांना पोलिसांचीही मदत मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा शुक्रवारी (ता. ८) विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर ड्रग्जमाफियांशी कोणत्याही प्रकारचे कनेक्शन आढळले तर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
कलम 311 अन्वये तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आमदार अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता. खोपोलीत 70 ते 80 किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांची बैठक घेतली होती. त्यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यात पोलिस विभागातर्फे ड्रग्जविरोधात लढाई सुरू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यांतील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते.’
काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळेच विशेषतः संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ अन् राजीनामा…
ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…
ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

