पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी खळबळ; बडा मासा एसीबीच्या जाळ्यात…

पुणे: पिंपरी चिंचवड महापालिकेतील मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्यावर एसीबीच्या पथकाने छापा टाकला असून, एका कामाचा ठेका (टेंडर) मिळवून देण्यासाठी 19 हजार रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागात एका कामाचा ठेका मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. हे काम मंजूर करून देण्यासाठी व ठेक्याची प्रक्रिया सुकर करण्यासाठी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी तक्रारदाराकडे १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. या कारवाई बाबत एसीबी ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तक्रार करणाऱ्या ठेकेदाराने सुमारे ९१ लाख ५७ हजार रुपयांची पाच टेंडर घेतली होती. या टेंडरच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी टेंडर रकमेच्या अर्धा टक्का दराने ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीच्या पडताळणीत ३८ लाख रुपयांच्या तीन टेंडर फाइल्सवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एसीबी ने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकत, प्रमोद ओंबासे यांच्या केबिन मध्ये जाऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या प्रकरणी पिंपरीतील संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला आणि धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात आणि अधिकारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सातबारा वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच; कोप्रोलीचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात…

IPS अधिकारी राहुल बन्सल लाच प्रकरणात अडकले; मुलाखतीदरम्यान म्हणाले होते…

शिक्षण उपसंचालक कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडले…

पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!