
ललित पाटील पलायन प्रकरणी आणखी दोन पोलिस बडतर्फ अन् राजीनामा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील आणखी दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा प्रकरणी पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली. पोलिस मुख्यालयात दोन्ही पोलिस ड्युटीवर होते. पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज माफिया ललित पाटील याने पलायन केल्यानंतर खळबळ उडाली होती. ललित पाटील याला अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्याच्या पलायन प्रकरणी यापूर्वी दोन पोलिसांना बडतर्फ केले होते. नाथा काळे आणि अमित जाधव अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणी एकूण १० पोलिसांना बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचा मुलगा डॉ. अमेय ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणामुळे डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अमेय ठाकूर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेय ठाकूर हे ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. राजीनाम्याचे कारण समोर न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
डॉक्टर संजीव ठाकूर पुण्यात ससून रुग्णालयाचे डीन म्हणून रुजू झाल्यानंतर डॉक्टर अमेय ठाकूर हे बी जे वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी डॉक्टर संजीव ठाकूर सोलापूरला शासकीय रुग्णालयात डीन म्हणून असताना डॉक्टर अमेय ठाकूर तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ज्याला सोलापुरातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. डॉक्टर अमेय ठाकूर यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती त्यांचे वडील डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या प्रभावातून झाल्याचा आरोप होत होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.
ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि मुलगा डा. अमेय ठाकूर या पितापुत्रांसाठी रुग्णालयात विशेष सेवा असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. ठाकूर पितापुत्रांना शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर देण्यात आले होते. हे ऑपरेशन थिएटर फक्त ठाकूर पितापुत्र वापरत होते. दुसऱ्या डॉक्टरांना हे ऑपरेशन थिएटर वापरण्याची परवानगी नव्हती. हे दुसऱ्या डॉक्टरांना देण्यात आले त्यावर चावी देणाऱ्या कर्मचाऱ्याला मेमो देत समज देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…
ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

