नाशिकमध्ये भोंदूबाबाने आश्रमातच ओलांडली मर्यादा; महिलेवर लैंगिक अत्याचार…

नाशिक: नाशिक शहरामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याने धार्मिक विधीच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नाशिक जिल्ह्याच्या येवला परिसरातून असाच प्रकार उघडकीस आला आहे.

एका भोंदूबाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित महिला आरोपीच्या आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

उमाकांत खंडेश्वर महाराज असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून फरार होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी दिंडोरी परिसरातून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला येवला येथील दत्तवाडी आश्रमात धार्मिक विधी करण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी उमाकांत खंडेश्वर याने पीडितेचा गैरफायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी खंडेश्वर महाराज पळून गेला होता. मात्र आता पोलिसांनी संशयित आरोपी उमाकांत खंडेश्वर महाराज याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…

अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…

नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…

लातूरमध्ये भोंदूबाबचे कांड; आई-वडीलांना बसवलं घराबाहेर अन् आतमध्ये शारीरिक संबंध…

पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!