हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांपैकी नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने मानसिक धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पिंपरी चिंचवड मधील मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोजवळील एका इमारतीवर ८ जुलै रोजी कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळला होता. या भीषण घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून ९ कर्मचाऱ्यांचा करुण अंत झाला होता. या मृत कर्मचाऱ्यांमध्ये नागेश गायकवाड यांचाही समावेश होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पती नागेश यांच्या अशा अकाली जाण्याने सोनाली गायकवाड या तीव्र मानसिक धक्क्याखाली होत्या. या विरहातूनच त्यांनी बुधवारी (ता. १२) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनाली यांच्या मागे दोन चिमुकल्या मुली आहेत. प्रथम वडील आणि आता आईचेही छत्र हरपल्याने या दोन्ही मुली पूर्णपणे पोरक्या झाल्या आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…

हृदयद्रावक! पुणे शहरात आईच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…

हृदयद्रावक! पुण्यात नोकरी मिळाली पण शाम्पूच्या पुड्यांनी घात केला; तिघींचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!