
पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…
सिंधुदुर्गः एक महिनाभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय 55, मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा. भांडूप) यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद आचरेकर यांच्या खुनाची बातमी समजताच कोळोशी परिसर हादरुन गेला. विनोद आचरेकर यांच्या मागे आई, पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विनोद आचरेकर यांचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. त्यांच्या घरी रात्री सोबत जेवण करून झोपण्यासाठी आलेला त्यांचा नातलग सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (वय 24, कोळोशी-वरचीवाडी) यानेच या घटनेची माहिती आपल्या वडिलांसह 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना दिली. सुरूवातीला तो विसंगत माहिती देत होता. मात्र त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान त्याने विनोद आचरेकर यांचा डोक्यात कुदळ मारून आपणच खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पण, खूनाचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विनोद आचरेकर यांच्या खुनाची घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वा. च्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास संशयितानेच दिलेल्या माहितीमुळे हि घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कोळोशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विनोद आचरेकर हे दोन दिवसापुर्वीच घर व परिसराची साफसफाई करण्यासाठी गावी आले होते. ते मुंबई येथे सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत होते. गेल्या महिन्यात त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे सर्व कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी संशयित सिध्दीविनायक पेडणेकर याने विनोद यांचा खून झाला असल्याची माहिती वडील संजय पेडणेकर यांच्यासह 100 नंबरवर कॉल करून पोलिस नियंत्रण कक्षास दिली तसेच 108 रुग्णवाहिकेसही दूरध्वनीव्दारे संपर्क साधून दिली. पोलिसांनी घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिस पाटील संजय गोरूले यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कणकवली व देवगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता विनोद आचरेकर यांचा मृतदेह पूर्णपणे नग्नावस्थेत आढळून आला. तर डोक्याच्या मागच्या बाजूला जबर जखम झाल्याने मोठा रक्तस्त्राव घटनास्थळी झालेला होता. डोक्यात कुदळ मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, स्थनिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे, अनिल हाडळ, हेमंत खोपडे, देवगड पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहा. पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, पोलिसपाटील संजय गोरूले, सरपंच गुरू आचरेकर, ग्रामसेवक मंगेश राणे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
खून झालेले निवृत्त सहायक पोलिस निरिक्षक विनोद आचरेकर हे संशयिताच्या वडीलांचे आतेभाऊ लागतात. बुधवारी रात्री विनोद आचरेकर यांच्यासाठी जेवणाचा डबा घेवून संशयित सिद्धीविनायक गेला होता. त्याचे वडील त्याला मोटरसायकलने आचरेकर यांच्या घरी सोडून आले. ते मुंबईहून आल्यानंतर गेले दोन दिवस संशयित त्यांच्याच घरी रात्री झोपायला असे. गुरुवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास संशयिताचे वडील संजय पेडणेकर यांना संशयित सिद्धीविनायकचा फोन आला आणि त्याने काका विनोद आचरेकर यांचा खुन झाल्याचे सांगितले. हि घटना ऐकू न ते हादरून गेले.
कणकवलीचे डिवायएसपी घनश्याम आढाव, कणकवलीचे प्रभारी पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार किरण मेथे, राजकुमार आघाव व एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहोचून बारकाईने पाहणी केली. फॉरेन्सिक टिमलाही पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञ, श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. संशयित सिध्दीविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी कणकवली येथे नेले. घटनास्थळावरील तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
संशयित सिद्धीविनायक पेडणेकर याने सखोल चौकशीत विनोद आचरेकर यांचा खुन कुदळ डोक्यात मारून आपणच केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सिद्धीविनायक पेडणेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. संशयित सिद्धिविनायक पेडणेकर याला नाटकात किंवा तमाशात स्त्री भूमिका करण्याची हौस आहे. त्याने त्यासाठी आपले लांब केसही वाढवले आहेत. मुलींचा पोशाख करून त्याने तसे फोटो काढले आहेत. तो रीलही बनवत असे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमाही केला आहे. त्याला कुठे ऑर्डर मिळाली तर तो जेवण बनवत असे. मात्र, तो विक्षिप्त वागत असल्याने वडिलांनी त्याची मानोसपचार तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली होती. मात्र, तो मनोरुग्ण नसून चांगला असल्याचा रिपोर्ट आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…
पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…
ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

