
देशभरात NIAचे ठिकठिकाणी छापे; आठ जण ताब्यात…
मुंबई : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शामिल नाचनसह काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एनआयएने मोठी कारवाई करत पडघा (भिवंडी) येथून ७ ते ८ जणांना अटक केली आहे.
पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने आता आणखी काही जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला पडघा गावातून अटक करण्यात आली होती त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
इसिस प्रकरणी एनआयएने देशात ४१ ठिकाणी छापे टाकले असून यात सर्वाधिक महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. यात कर्नाटकात एका ठिकाणी तर उर्वरित छापे महाराष्ट्रात टाकण्यात आलेत. महाराष्ट्रात 02 पुणे, 31 ठाणे ग्रामीण, ठाणे शहर 09 , मीरा भाईंदर 01 याठिकाणी छापे टाकले आहेत.
एनआयएनं देशभरात 44 जागांवर एनआयएनं धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.
आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे. भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झाले आहे.
ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.
पुण्यात ‘एनआयए’कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…
दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…
पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…
पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

