आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय २०) याची गोळ्या घालून खून केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. आयुषच्या हत्येचा एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा 12 वर्षाचा लहान भाऊ. लहान भावाला क्लासवरून घेऊन आलेल्या आयुषवर घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयुष कोमकर ची आई आणि वनराज आंदेकरची बहीण कल्याणी गणेश कोमकरने या प्रकरणी तक्रार केली आहे. आयुषची आई कल्याणीने दिलेल्या माहितीनुसार, आयुषला एक लहान भाऊ असून त्याचे नाव अर्णव आहे. आर्णव रोज संध्याकाळी कॅम्पमध्ये क्लासला जात असे. मात्र, त्याची ट्युशन घरापासून लांब असल्याने आयुष संध्याकाळी भावाला घेण्यासाठी गेला होता. घराच्या खाली आल्यानंतर आयुष हा पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी गेला त्यावेळी त्याच्यावर दोन जणांनी येऊन गोळ्या झाडल्या. याच हत्येचा बदला आयुष याच्या खुनाद्वारे घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी दबा धरून बसलेल्या अमन खान, यश पाटील यांनी त्याच्यावर 11 गोळ्या झाडल्या. आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचे कल्याणी कोमकर यांनी फिर्यादीत लिहिले आहे.

आयुषच्या लहान भावाने दिलेल्या माहितीनुसार, ‘क्लास सुटल्यानंतर दादासोबत मी आलो. गाडीवरुन खाली उतरलो आणि दादाने गाडी पार्क केली. तेवढ्यात पाठीमागून दोन मुले पळत आली आणि त्यांनी माझ्या दादावर समोरून गोळ्या झाडल्या. त्यानंतर दादा खाली पडला. आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर पार्किंगमध्ये मोठी गर्दी जमली होती. इमारतीतील एका व्यक्तीने आयुषच्या आईला फोन करून मुलाला कोणीतरी मारहाण केली असे सांगितले. आयुषची आई खाली आली तर लहान मुलगा अर्णव रडत होता आणि मोठा मुलगा आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना तपासणीसाठी बोलवले त्यांनी तपासणी केली असता ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले.’

दरम्यान, माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरातील आंदेकर टोळीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर यांच्या फिर्यादीवरुन समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!