
पुणे! सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत प्रियकराचं धक्कादायक कांड, दिल्या खेळण्यातील नोटा…
पुणे: पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१) याला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीने (वय ३२) एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. या साईटवरून तिची ओळख गोरखनाथ भाऊ गावंडकर (वय ४१) याच्याशी झाली. गोरखनाथने आपले पालघर येथे रेस्टॉरंट आणि बार असल्याचे सांगून युवतीचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी जवळीक वाढवली. यानंतर युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, २१ लाखांच्या बदल्यात आरोपीने युवतीला ५० लाखांच्या खेळातील खोट्या नोटा देऊन तिची क्रूर थट्टा केली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
लग्नाचे स्वप्न दाखवून गोरखनाथने तरुणीकडून वेळोवेळी २१ लाख रुपये उकळले. जेव्हा तरुणीने पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपीने तिला ५० लाख रुपये देतो असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात ५० लाख रुपयांच्या बदल्यात त्याने युवतीला खेळातील चिल्ड्रन्स बँकेच्या खोट्या नोटांची पुडकी देऊन मोठी फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने तातडीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना मार्च २०२५ पासून ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी गोरखनाथ गावंडकर याला अटक केली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी…
पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

