येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…

पुणे (संदीप कद्रे): दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले.

अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतून, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे डॉ. जालिंदर सुपेकर यांचे मार्गदर्शनाखाली व कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे स्वाती साठे यांचे प्रेरणेने कारागृह उद्योग अंतर्गंत बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून दिवाळी सणानिमित्त कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे श्रीमती स्वाती साठे उपस्थित होत्या.

सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभाग ब्रीद असुन कारागृहातील हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे निश्चितच त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. तसेच बंदयांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उददेशाने महाराष्ट्र कारागृह उदयोग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली असुन सदर विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तुंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधुन बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिवाळी सणानिमित्त यावर्षी बंदयांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या आकर्षक वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन ०५.११.२०२३ रोजी करण्यात आले.

सदर कार्यक्रमादरम्यान बंदयांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, आकाशकंदील, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, लाडु, शेव, बिस्कीट तसेच इतर सर्व जीवनापयोगी वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनास सामान्य नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या वर्षी बंद्यांनी हातमागावर तयार केलेल्या विविध रंगाच्या पैठणी साडयांचे प्रदर्शनात मुख्य आकर्षण होते. तरी सामान्य नागरीकांना अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह बंदी निर्मित विविध वस्तू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या कार्यक्रमादरम्यान केले.

कार्यक्रमास कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, उपअधीक्षक बी. एन. ढोले, श्रीमती पल्लवी कदम, रविंद्र गायकवाड, मंगेश जगताप, नागेश पाटील तसेच इतर सर्व अधिकारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!

कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!