
चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…
पाटणा (बिहार) : एका चोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याची माहिती समजल्यावर धक्का बसला आहे. चोराला 10 पत्नी आणि 6 मैत्रिणी आहेत. त्याच्याकडे जग्वारसारखी महागडी गाडी असून, तो चोरी करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने प्रवास करत असे. चोर हा चोरीच्या पैशांतील काही वाटा सामाजिक कामासाठी खर्च करत होता.
चोराची एक पत्नी सीतामढी येथील जिल्हा परिषद सदस्य आहे. त्याची दुसरी पत्नी भोजपुरी चित्रपटांमध्ये अभिनय करते आणि ती मुंबईत राहते. हा चोर ज्या शहरात चोरी करायला जातो तिथे तो नवीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करत असे. दोन वर्षांपूर्वी या चोराला गाझियाबादच्या कविनगर पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी पोलिसांनी त्याची जग्वार कार जप्त केली होती; पण ही कार त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. सीतामढी येथे राहणाऱ्या या चोराचे नाव मोहम्मद इरफान उर्फ उजाला असे आहे. पोलीस चौकशीत त्याने 10 पत्नी आणि 6 मैत्रिणींची नावे सांगितली आहेत.
मोहम्मद इरफान एखाद्या शहरात चोरी करण्यासाठी तिथे आठ ते दहा दिवस राहत असे. आलिशान घरांची रेकी करायचा आणि चोरी केल्यानंतर फरार होत असे. बिहार ते दिल्ली हा प्रवास तो त्याच्या जग्वार गाडीतून करतो. यापेक्षा लांबचा प्रवास तो विमानाने करतो. 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य, स्टायलिश कपडे परिधान करून तो युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. चोराने सांगितले की, ‘माझी पहिली पत्नी गावाकडे राहते. ती जिल्हा परिषद सदस्या आहे. दुसरी पत्नी अभिनेत्री असून ती भोजपुरी चित्रपटात काम करते. मोहम्मद इरफान हा चोर असला तरी गावातले लोक त्याला देव मानतात. कारण तो गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतो.
चोराने मिळालेल्या पैशांमधून गावात पक्के रस्ते केले आहेत. वीजेची समस्या सोडवली आहे. त्याची पहिली पत्नी पहिल्यांदा बिनविरोध निवडून आली होती. त्यानंतर ती मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. इरफान दर वेळी जबरी चोरी करतो, असेही पोलिसांनी सांगितले.
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
भावनिक पोस्ट! आईची शेवटची आठवण आहे; चोराला केली नम्र विनंती…
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्…

