पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

पुणे: हिंजवडी फेज-1 मध्ये एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या युवकाने सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीयूष कवडे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पीयूष कवडे याने सोमवारी (ता. 28) दुपारच्या सुमारास ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका”, असे त्याने म्हटले आहे. पीयूष कवडे हा गेल्या वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता. चांगल्या पगाराची नोकरी असताना त्याने आत्महत्या का केली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मिटींगमधून सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. पीयुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यानंतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली का? यावर देखील पोलिस तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण समोर आले नसले तरी वैयक्तिक कारणांतून पीयूषने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…

पुणे शहरातील आयटी परिसरातून परदेशी युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका…

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!