पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…
पुणे: पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचाऱ्याला म्हणाला दोन दिवसांत बघून घेतो अन् रस्त्यावरच झोपला…
छत्रपती संभाजीनगर : पोलिस कर्मचारी वाहतूकीचे नियंत्रण करत असताना मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी […]
अधिक वाचा...वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना मोजावी लागणार मोठी किंमत…
मुंबई : वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. सिग्नल तोडणे, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे यासारख्या चुका केल्यातर नव्या नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द केला जाऊ शकते. रस्ते सुरक्षेला अधिक मजबूत […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. राजेंद्र गायकवाड यांना शनिवारी (ता. १९) साप्ताहिक सुट्टी असल्याने ते घरीच होते. […]
अधिक वाचा...वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण…
पालघरः नालासोपारा येथे ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना मारहाण करणारे दोघं बापलेक आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ड्राइविंग लाइसेंस नसलेला मुलगा गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि लायसन्सआणि […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिस नाईक धनाजी भरत वणवे (वय 42) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कात्रज मंडई चौकात बुधवारी (ता 10) सायंकाळी 6.45 वाजता घटना घडली. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलिस दलात शोककळा पसरली आहे. पोलिस नाईक धनाजी वणवे नेहमीप्रमाणे वाहतूक नियमनासाठी कात्रज मंडई चौकात तैनात होते. अचानक त्यांना चक्कर […]
अधिक वाचा...महिला पोलिस हात जोडत म्हणाल्या, मी आईच्या भावनेने रागावले…
लातूर : ए झिपरे, लाव तुझ्या बापाला फोन.. असे म्हणत तीन युवतींना मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने हात जोडत माफी मागितली आहे. त्या तिघींचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे माझा राग अनावर झाला. मी त्या मुलींना व तिच्या कुटुंबीयांना जे बोलले त्याबद्दल मी माफी मागते, असे म्हणत वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी […]
अधिक वाचा...महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले…
लातूर : लातूरमध्ये स्कुटीवरून ट्रिपलसीट निघालेल्या युवतींना महिला कॉन्स्टेबलने अडवून चांगलच झापले आहे. संतप्त महिला वाहतूक पोलिसाने या मुलींना आधी बडवलं आणि नंतर सुनवले देखील. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीव लई वर झाला का… रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन युवतींची भर रस्त्यावर तुफान शाब्दीक धुलाई […]
अधिक वाचा...वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…
पुणे: राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. एचएसआरपी नंबर प्लेटची खासियत म्हणजे हिला एक युनिक पिन नंबर असतो. गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिट पिन नंबर असतो. तर इतर […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…
पुणे : पुणे शहरात एका दुचाकीस्वाराने पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुचाकी चालकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश गणपत नाईक (वय ४७) हे पोलिस हवालदार जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेश […]
अधिक वाचा...
