
Video: पोलिस अधिकाऱ्याची राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ठरली अखेरची…
धाराशिव: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहन भीमा जाधव (वय ५५) असे मृत पावलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि तिरंग्याला सन्मानाने सलामी दिली. कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थितांसोबत फोटो काढत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही समजण्याच्या आतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख होती. त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली ही सलामी त्यांची अखेरची सलामी ठरली.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्या व्हिडीओमध्ये मोहन जाधव हे आपल्या काही सहकाऱ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी फोटोसेशन सुरू असताना एका सेकंदाच्या आत ते जमीनीवर धडकन कोसळले. त्यांना स्वत:ला सावरायला एक सेकंदही मिळाला नाही. क्षणात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…

