पुणे! स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट स्टॅण्ड परिसरामध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले असून एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. १४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५) मधील एम. एच.-१२- यू / एल -५२०३ यावरील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सपोनि. अभिजीत पाटील व तपास पथकातील अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख यांचेसह शोध घेत असताना पो / अं सुजय पवार, फिरोज शेख, हनुमंत दुधे स्वारगेट पोलिस स्टेशन यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील आरोपी हे ग्रे रंगाचे वर्गमॅन मोपेड क्रमांक एम. एच. १२-यू / एल -५२०३ हिचे वरुन स्वारगेट कॅनॉल येथे आले आहेत. यानंतर वरिष्ठांनी पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

सपोनि. अभिजीत पाटील यांनी दोन पंचांना बोलावून घेवून पोलिस अंमलदार १००५७ पवार, पो/अं १००६२ शेख व हनुमंत दुधे यांना मिळालेल्या बातमीचे ठिकाणी आले. पहाटे ०५/१० वा. चे सुमारास जावुन एका ग्रे रंगाचे वर्गमॅन मोपेड क्रमांक एम.एच.-१२-यू/एल-५२०३ यावरुन दोन व्यक्ती येत असल्याचे दिसुन आल्याने त्यांना पोलिसांनी थांबवले. १) आयान रिजवान शेख (वय २१ वर्षे रा. अंगारशाह तकीया बस्ती, १०१, भवानी पेठ पुणे), २) रमजान रज्जाक शेख (वय २६ वर्षे रा. ३११, कासेवाडी, भगवा चीक, पुणे) अशी दोघांची नावे आहेत. दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे दोघांचे ताब्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग मोबाईल तसेच इतर ०४ वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल फोन मिळुन आले. त्यावेळी सदर मोबाईलबाबत स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं. १) १४ / २०२६ भा. न्या. संहिता कलम ३०४(२), ३(५) २) १५/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०४ (२), ३(५) या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यात मिळालेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींना पुढील तपासकामी अटक करण्यात आली असून स्वारगेट पोलिस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणलेले असुन एकुण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा सह-आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलींद मोहीते, पोलिस उप-आयुक्त परि-२, पुणे शहर, धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास भारमळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे), अभिजीत पाटील, सपोनि. तपास पथक, लक्ष्मण जाधव, पोलिस उप-निरीक्षक, पो. अं. सुजय पवार, हनुमंत दुधे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, अमोल जाधव, हर्षल शिंदे, दिपक दाड, प्रशांत टोणपे, सागर काळे, संदिप घुले यांनी एकत्र मिळून केली आहे.

पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…

पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…

पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!