‘पुणे ग्रँड टूर’! पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

सह-पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तब्बल ४ हजार ३८१ पोलिस कर्मचारी आणि १२ पोलिस उपायुक्तांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून स्पर्धेला सुरुवात होईल आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोप होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत स्पर्धेच्या ७५ ते ९५ किमी लांबीच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. राधा चौक (बाणेर), सूस रस्ता, पाषाण, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, वनाज, नळस्टॉप, टिळक रस्ता आणि अप्पा बळवंत चौक या भागांतून ही शर्यत मार्गक्रमण करेल.

वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्पर्धेच्या मार्गावर कोठेही वाहने उभी करू नयेत. तसेच प्रेक्षकांनी बॅरिकेड्सच्या मागे राहूनच खेळाडूंचा उत्साह वाढवावा. दुपारी १२ ते ४ या वेळेत पाषाण, लॉ कॉलेज रस्ता आणि सातटोटी चौक यांसारखे महत्त्वाचे रस्ते आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवले जातील.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत):
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर – सूस रस्ता)
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाज-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता ते बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेवन लव्हज चौक
सेवन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर

पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…

पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी; कधीपर्यंत पाहा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!