DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू…

कोल्हापूर: कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत.

वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज (रविवार) पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा आणि ट्रकच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलासह अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!