
बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…
बीड: बीड जिल्ह्यात आणखी एका युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या कडा परिसरात एका ट्रकचालक तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकच्या मालकानेच त्याला दोन दिवस डांबून बेदम मारहाण केली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत ट्रकचालक तरुण विकास अण्णा बनसोडे (वय 23) याचे ट्रकचा मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विकास बनसोडे याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली. या मारहाणीत विकास याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्याचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आणून ठेवला आणि निघून गेले. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भाऊसाहेब क्षीरसागर याच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विकास बनसोडे याला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. विकास बनसोडे हा गेल्या तीन वर्षांपासून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रकचालक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरुन काढण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी विकास आपल्या मित्रांसह पिंपरी या गावात आला होता. यानंतर विकासचे अपहरण केले आणि त्याला पत्र्याच्या एका शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी त्याला दोन दिवस बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकासला प्रचंड मारले. त्यामुळे विकासच्या मृत शरीरावर काळेनिळे वळ दिसत होते.
मृत विकास बनसोडे याच्या भावाच्या फिर्यादीवरुन बीड पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.
दरम्यान, विकास याला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण करत असताना आरोपींनी विकासच्या फोनवरुनच त्याच्या आई-वडिलांना फोन केला होता. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर याने विकासच्या आईवडिलांना तातडीने आमच्या घरी निघून या, असे सांगितले. त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लीप समोर आल्याचे समजते. त्यावेळी विकासच्या आई-वडिलांनी आमच्या मुलाला आणखी मारु नका, अशी विनवणी केली. मात्र, तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…
बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…