
पुणे शहरातील खडी क्रशींगमधील मोटारी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील खडी क्रशींग प्लॅटमधील रु१८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी चोरी करणाऱ्या आरोपीस काळेपडळ पोलिस स्टेशन तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय, मुद्देमाल हस्तगत केला आहे.
डाची वाडी पुणे येथे चालू असलेल्या खडी क्रशींग कामासाठी लागणाऱ्या रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी २१/०४/२०२५ रोजी चोरी केले बाबत काळेपडळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर १३७/२०२५ भा.न्या. सं कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक काळेपडळ पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथकास गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. तपासपथकातील पोलिस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आकाश संजय मोरे (रा. रामटेकडी हडपसर पुणे) याने सदर प्लांट वरील कामास असलेल्या त्याच्या मित्राचे मदतीने केला आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना सदर इसमास रामटेकडी, हडपसर येथे सापळा लावून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे मित्राचे मदतीने गुन्हा केल्याचे कबुल आहे.
आरोपीने खडी बारीक करण्याच्या एकूण १५ मोटारी चोरी केल्या असून त्या जड असल्याने अज्ञात ठिकाणी ताडपत्रीखाली लपवून ठेवल्या होत्या. नंतर ते भंगार दुकानात विकणार असले बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून एकुण रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी काळेपडळ पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत करुन गुन्ह्यात चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,काळेपडळ पोलिस स्टेशन, अमर काळंगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलिस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, नितीन ढोले, अतुल पंधरकर, नितीन शिंदे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
पुणे! दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेने आरोपीस २४ तासात केले जेरबंद…
पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासाच्या आत सोलापूर येथून केले जेरबंद…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

