दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘कॉकरेच जनता पार्टी’ संघटनेतर्फे जंतर-मंतर […]
अधिक वाचा...पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…
छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युवकाकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. साध्या चप्पलवर पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं […]
अधिक वाचा...DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलिस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) चंद्रकांत खांडवी हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. आश्रमशाळेत राहून, दिव्यावर अभ्यास करून मोठे यश संपादन केले आहे. शाळेचे काम करत असताना आणि कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक म्हणून आठ वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी […]
अधिक वाचा...Video: पोलिस हे आपले शत्रू नव्हे तर मित्र : डॉ. राजकुमार शिंदे
पुणे (संदिप कद्रे): विद्यार्थी व युवा हे आपल्या विकसित राष्ट्राच्या वाटचालीतील मुख्य भागिदार आहेत. इंजिनिअर, संशोधक म्हणून त्यांच्या खांद्यावर भविष्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहावे, भरपूर अभ्यास करावा आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून कुठलीही समस्या आल्यास थेट कायदा हातात न घेता, प्रथम ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. कारण, पोलिस हे आपले शत्रू […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
बंगळूरू (कर्नाटक): एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी महिलेला घेऊन केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…
छत्रपती संभाजीनगर : ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ’ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) स्मार्तना पाटील या गेल्या २० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या त्या पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या खेडेगावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सातारा जिल्ह्यात १९९६ साली सर्व शासकीय प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत होत्या. संबंधित वृत्त टीव्हीवर ऐकले आणि आपणही असेच काही तरी व्हावे असा […]
अधिक वाचा...
