Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशनच्या मार्शल अंमलदारांनी गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. पोलिस अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या ‘सीपीआर’मुळे (CPR) एका कुटुंबाचा आधार वाचला असून, पुणे पोलिस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. View this post on Instagram A post shared by […]
अधिक वाचा...DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू…
कोल्हापूर: कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज […]
अधिक वाचा...धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८) यांची निघृण हत्या करून त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात आणि जिल्ह्यात मोठी खळबळजनक उडाली आहे. नानासाहेब […]
अधिक वाचा...पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पुणे: एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना देखील महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत उत्कृष्ट तपास करतात. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव, निरीक्षणशक्ती आणि पोलिसी बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गुन्हे उघडकीस येतात आणि आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणले जाते. पोलिसांच्या अशा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी तपास कार्यावर आधारित लेखांचे ‘पोलिसकाका’च्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारत आहे. मात्र २०२५ हे वर्ष पुण्यासाठी केवळ विकासाचे नव्हे, तर गुन्हेगारीच्या दृष्टीने चिंताजनक होते. पण, पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि कारवायांमुळे गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसला… पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, संघटित […]
अधिक वाचा...पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी; पाहा रचना…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वित्त आणि गृह विभागाला पाच नवीन पोलिस ठाणी, अतिरिक्त मनुष्यबळ, दोन नवीन परिमंडळाच्या निर्मितीस मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देताना वित्त विभागाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. पुणे पोलिस दलात आता सात परिमंडळे (झोन) […]
अधिक वाचा...PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ…
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य केल्याचे आदेशात म्हटले आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी; मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या पोलिस उपनिरीक्षकाला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २) रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचून […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कार्यालयाने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्र पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर 322 […]
अधिक वाचा...दामिनी मार्शल सोनली हिंगे यांच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन मुलीचे थांबले लग्न…
पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील एका शाळेत शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थिनीचे शिक्षण थांबवून तिचे लग्न लावण्याचा पालकांचा विचार दामिनी मार्शल सोनली हिंगे यांच्या हस्तक्षेपामुळे हाणून पाडण्यात आला आहे. शिवाजीनगर पो ठाणे हद्दीतील एका शाळेतील शिक्षकांचा मदतीकरिता कॉल आला की, त्यांच्या शाळेतील सातवीच्या वर्गातील एक विद्यार्थिनी मागच्या 8-10 दिवसांपासून शाळेत येत नाही व तिच्या मैत्रिणीकडून […]
अधिक वाचा...
