एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): नागरीकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून बँकेचे खात्यामधून डेबीट कार्डद्वारे वेग-वेगळ्या एटीएम सेंटर मधून रक्कम काढून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी हे २२/०९/२०२३ रोजी महालक्ष्मी विहार सोसायटी, विश्रांतवाडी चौक,पुणे येथील बँकेचे एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सदर ठिकाणी दोन अनोळखींनी संगनमत करून फिर्यादी यांचेकडून […]
अधिक वाचा...जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…
रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे. आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सरोजिनीला खेळाची उपजतच आवड होती. शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटर अनवाणी प्रवास करावा लागत असे. अॅथलेटिक्समध्ये कौशल्य मिळवत सातत्याने बक्षिसे जिंकली. […]
अधिक वाचा...महिलेने आत्महत्येपूर्वी भिंतीवर लिहीले की, खरंच खूप थकले मी…
छत्रपती संभाजीनगर : एका महिलेने वारंवार पती संशय घेत असल्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा परिसरात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली नावाच्या महिलेने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी घराच्या भिंतीवर तिने भिंतीवर आपली सुसाइड नोटही लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, ‘आता माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…
पालघर: मोखाड्यात येथे भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर ही बारावीत वर्गात शिकत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोखाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आश्रम शाळेतून महाविद्यालयात […]
अधिक वाचा...डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…
मुंबई : मुंबईमधील मालवणी भागातल्या डॉक्टरने तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. योगेश सुनील भद्र भानुशाली (वय ३३) असे या डॉक्टरचे नाव आहे. एका 21 वर्षीय युवतीने डॉक्टरबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डॉक्टर भानुशालीवर 21 ते 24 वर्ष वयाच्या आणखी दोन युवतींनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक […]
अधिक वाचा...मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…
मुंबई : गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन […]
अधिक वाचा...राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्याच महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत. सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकूण ९ आरोपींच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाना पेठेत काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतीलसराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्याच आंदोकर टोळीतील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह नऊ जणांच्या समर्थ पोलिसांनी बेड्या […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…
कोल्हापूर : प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रेयसीच्या घरी पहाटेच्या सुमारास जाऊन तिचा वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजी येथे घडली आहे. संबंधित प्रेयसीने आरडाओरडा आणि झटापट केल्याने प्रियकराने वायर टाकून पळ काढला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात दिलीप राजेंद्र पागडे (वय 34, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
पुणेः पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांत पीडित नगरसेविका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण […]
अधिक वाचा...
