थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पण, मालकाची समय सुचकता आणि आजूबाजूंच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीने मंचर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेऊन साडेसहा लाखाचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या दोन टीम इतर दोन दरोडेखोरांच्या शोधा साठी रवाना केले असल्याची माहिती खेड पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) शहराच्या बाजारपेठेत भर वस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. एक महिन्यापासून या दुकानाची रेकी दरोडेखोरांनी केली होती. त्यांना स्थानिक दोघांनी मदत करत इतर इत्यंभुत माहिती पुरवली. रात्री मालक अभिजीत समदडीया पहिल्या मजल्यावर तर त्यांच्या आईललिता बाई (वय ७५ ) मुले यश (वय २१) जैना (वय १६) हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. बुधवारी (ता. ८) पहाटे सव्वा दोन वाजता सात दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईप वरून तीन मजली इमारतीवर चढले. दरवाजा तोडून जिन्याने ते सोने चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोंड फिरवण्यात आले.

दुकानातील १८ किलो ७१० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच दोन लाख बावीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज घेऊन परत जाताना एका दरोडेखोराचा धक्का पहिल्या मजल्यावरील दरवाजाला लागला. झोपलेला यश याला वडील आले असावेत असे समजून त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी हातात कोयता, कटवणी घेऊन दरोडेखोरांनी हल्ला चढविला. यश परत आधीच्या खोलीत गेला. त्यावेळी झोपलेल्या जैना यांच्याकडे दरोडेखोराने मोर्चा वळवला. जैना ने धाडस दाखवत एका दरोडेखोरला लाथ मारली. त्यावेळी दुसऱ्यांनी तिचे तोंड दाबले असता तिने त्याला हाताचा चावा घेतला. ललिता समदडीया यांना दमदाटी करत तुमच्या घरात रोख रक्कम आहे. आम्ही महिन्यापासून वॉच ठेवला आहे. लॉकरची चावी द्या अशी मागणी केली. ललीताबाई यांनी चावी नसल्याचे सांगितले.

दरोडेखोरांनी तिघांना आतील रूममध्ये बांधून ठेवले तसेच तेथील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. यादरम्यान दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या अभिजीत समदडीया यांना झटापटीचा आवाज आला. त्यांनी मोबाईल मधील सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले, त्यावेळी दोन जण घरामध्ये उचका पाचक करत असल्याचे दिसले. दुकानावर दरोडा पडल्याचे लक्षात येताच अभिजीत समदडीया यांनी गिरीश शेठ समदडीया, धीरज समदडिया, महावीर संचेती, अमोल पारेख यांना मोबाईलवर घटना कळवली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक जवळच रात्रगस्त घालत होते, त्यामुळे पोलिस पथक त्वरेने घटनास्थळी आले.

पोलिसांची चाहूल लागतात पाच दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले. दोन चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले. बाजारपेठेतील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने मदतीसाठी येऊन त्यांनी परिसराला वेढा घातला. गिरीश शेठ समदडीया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे. वैभव बाळू रोकडे, गणेश रामचंद्र टोके, अजय सखाराम भिसे, ग्यानसिंग भोला वर्मा व मोहम्मद अरमान दर्जी यांना पोलिसांनी मुद्देमाला सह पकडले आहे. अन्य दोघे फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याचेही सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…

वळसे पाटील व देवेंद्र शेठ शहा यांच्या विरोधात आंदोलन करतो काय? म्हणून मारहाण…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!