
पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…
पुणेः मैत्रिणीला भेटण्यासाठी एकाने चक्क बुरखा घालून तिला भेटण्याचे ठरवले. मात्र, शाळेच्या परिसरात गेल्यावर त्याचे बिंग फुटले आणि मुलांनी त्याला चोप दिला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विजय अमृत वाघरी (वय 23, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात विश्रांतवाडी भागातील एका शाळेत बुरखाधारी व्यक्तीने शाळकरी मुलाला येथील भुयारी मार्गात अडविण्याचा प्रयत्न केला. बुरख्यामध्ये पुरुष असल्याचे कळताच युवकाने विरोध केला, तर एकाने संबंधित व्यक्तीला चावा घेतला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. बुरखा घालणारी व्यक्ती शाळकरी मुलांचे अपहरण करीत असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.
एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणातील आरोपीला आता विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्याने मुलांचे अपहरण करण्यासाठी नव्हे, तर आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा घातल्याचे समोर आले आहे. आरोपी विजय एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीचा प्रयत्न करीत होता. तिला भेटण्यासाठी त्याने बुरखा घातला होता. मुलगी जात असलेल्या शाळेच्या आवारात थांबून तेथून निघालेल्या मुलाकडे चौकशी करण्यासाठी गेला अन् त्याचे बिंग फुटले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे, दीपक चव्हाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून विजयचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…