चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…

डेहराडून (उत्तराखंड): पुतण्याने चुलतीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. चुलतीने विरोध केल्यामुळे पुतण्याने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

डेहराडूनमधल्या दिडौली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावात ही घटना घडली आहे. एका विवाहित महिलेची तिच्या दीराच्या मुलाने छेड काढली. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिने या गोष्टींना विरोध केला असता पुतण्याने आणि त्याच्या आईने पीडित महिलेला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्यांदा पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर पोलिस कारवाई सुरू केली आहे.

दिडौलीमधील एका गावात राहणारा मजूर डेहराडूनमध्ये मजुरीचे काम करतो. त्याची पत्नी मुलांसोबत गावी राहते. या विवाहित महिलेचा पुतण्या रितीकची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिची वारंवार छेड काढत असे. 28 ऑगस्टला रात्रीच्या वेळी ही महिला घराच्या अंगणात झोपली होती. तेव्हा रितीक भिंतीवरून उडी मारून चुलतीच्या घरात घुसला आणि तिला वाईट हेतूने स्पर्श करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. रितीकला विरोध केला असता त्याने मारहाण सुरू केली. पीडित महिलेने आरडाओरडा केला असता आजूबाजूचे लोक जमा झाले. यावेळी रितिकची आई आली. तिने रितिकला रोखण्याऐवजी पीडित महिलेलाच मारहाण सुरू केली. या प्रकरणी आई आणि मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…

दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…

भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध; मामाने घेतला मोठ निर्णय…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!