
पुणे शहरात महिला घरात असताना धडकली बंदुकीची गोळी अन्…
पुणे : कोथरूडच्या भुसारी कॉलनीत बंदुकीच्या गोळी थेट घराच्या खिडकीत जाऊन अडकल्याची घटना घडली आहे. गोळी नेमकी कुठून आली? याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे शहरातील भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स या डोंगराच्या शेजारीच एक सोसायटी आहे. एक महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात बसलेली होती. बाल्कनीला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचेचा जोरात आवाज झाला. आवाज नक्की कशाचा होता, हे पाहण्यासाठी महिला गेली असता, खिडकीमध्ये बंदुकीची गोळी अडकल्याचे दिसले. मंगळवारी (ता. २०) सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकही तपासणीसाठी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, ‘राहुल टॉवर ही सोसायटी डोंगरालगत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओची लॉग रेंज या सोसायटीपासून अगदी जवळ आहे. डीआरडीओच्या सरावावेळी एखादी गोळी चुकून आली असेल ती खिडकीच्या काचेला धडकून तिथेच अडकून राहिली असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वीही काहीवेळा असे प्रकार समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी मेट्रो स्टेशनच्या कामादरम्यान एका कामगाराला गोळी लागली होती. यात तो जखमी झाला होता.
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…
पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…
पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…
पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

