पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्याला युनिट 06ने घेतले ताब्यात..

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात चैन स्नॅचीग व वाहन चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 06 ने पकडले असून, त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गुन्हे शाखा यूनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे यूनिट हद्दीत मंगळवारी (ता. ७) पेट्रोलिंग करीत असताना पो.अंम 8159 ऋषीकेश ताकवणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खडकी पोलिस स्टेशन गु र नंबर 401/2023 भा दं वि क 392,34 (जबरी चोरी) प्रमाणे अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद आहे. सदरचा गुन्हा हा पुणे शहर रेकॉर्डवरील आरोपी योगेश सोनवणे याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी सदर माहिती तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी मिळाले बातमीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय व त्यांचे टीमने त्या अनुषंगाने त्याचा शोध घेत असताना तो गोल्डन बेकरीसमोर, वडगाव बुद्रुक, पुणे येथे थांबला असल्याची माहिती मिळाल्याने स्टाफ सह जाऊन त्यास दुचाकीसह ताब्यात घेतले.

योगेश जगदीश सोनवणे (वय २३ रा. घर नंबर ७३४, अडीकँप चौक, नानपेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा सुझुकी अक्सेस दुचाकीवरून त्याचा साथीदार राहुल कांबळे याच्यासह केल्याची कबुली दिली. सदर दुचाकी वाहनाबाबत माहिती घेता सदरबाबत कोथरुड पो स्टेशन गु र नं 233/2023 भा दं वि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती मिळाली आहे. गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण या भागात चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपास कामी खडकी पोलिस ठाणे यांचे स्वाधीन केले आहे. तर राहुल कांबळे यास खडकी पोलिस ठाणे यांनी ताब्यात घेतला आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहा. पोलिस आयुक्त गुन्हे २ या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पो हवा रमेश मेमाने, पो अं ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे या पथकाने केलेली आहे.

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…

पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!