संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेले चौघे पकडले; जाणार होते…

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर पोलिस कारागृहातून पळालेल्या चार सराईत आरोपींना पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणामध्ये चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पळालेले चारही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते. यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा निकाल लागणार असल्यामुळे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यालगतचा कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. पण, अवघ्या तीस तासांतच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. तसेच त्यांना मदत करणाऱ्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हा अन्य विभागाच्या पथकाने पकडले आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिद्र मनाजी जाधव, तसेच त्यांना मदत करणारे दोन जण असे एकूण सहा जण यामध्ये आरोपी आहेत. यांच्यावर 120 कलाम वाढवण्यात आले आहे, आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते.

दरम्यान, वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती.

संगमनेर कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी गज कापून पळाले…

थरार! मंचर येथे दरोडेखोरांचा डाव उधळला; कसा पाहा…

येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन…

येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!

कारागृहातील नवऱ्याच्या कैदी मित्राच्या प्रेमात पडली पत्नी अन् पुढे…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!