
शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…
मुंबई: शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार माहिम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली होती. पीडित १३ वर्षीय मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना १६ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. निर्जन ठिकाणी नेल्यानंतर आरोपीने पीडित मुलीचे हातपाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या गुन्ह्यात आरोपीसोबत आणखी एक जण सहभागी होता. आरोपींनी पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
View this post on Instagram
दरम्यान, अनेक दिवस आरोपींचा त्रास सहन केल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने माहिम पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी भाभा रुग्णालयात पाठवले आहे. माहिम पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
प्रेमाचा त्रिकोण! पुण्यात प्रियकराची सपासप वार करत निर्घुण हत्या…
भंडारा हादरलं! तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार…
कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…
पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…
कोल्हापुरात व्यावसायिकाचे अपहरण अन् करंट देऊन केली अमानुष हत्या…

