हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

नाशिकः मनवेल येथील एका विवाहीत गरोदर महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनवेल (ता. यावल) येथील शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२) या गरोदर होत्या. घरात असलेल्या छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते, ते देखील यात दगावले आहे. यावल पोलिस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!