मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…
मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगाने तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारने वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनेही इनोव्हा गाडीला धडक दिली. वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळे अनेकजण घाबरले होते.
वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात हनिफ पिर, हमाबीबी पिर ,खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. असीम सदर, हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींची नावे कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…
बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!